खा.रामराव वडकुते यांचा कळमनुरीत नागरी सत्कार
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी, राज्यसभेवर नुकतीच बिनविरोध निवड झालेले खासदार रामराव वडकुते यांचा नागरी सत्कार सोहळा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.भाजपकडून रामराव वडकुते यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा कळमनुरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार तान्हाजी मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसनराव वानखेडे,
जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, शिवदास बिरगड, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अतिष दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते खासदार रामराव वडकुते यांचासत्कार करण्यात आला व तसेच कळमनुरीवासीयांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम ढोणे, हभप रामकिशन ठाकूर, दिलीप देसाई, संजय कावडे, डॉ. जयदीप देशमुख, प्रकाश नाईक, नगरसेवक राजू जाधव,ओंकार नावडे, अशोक संगेकर, उमेश
सोमानी, सुरेशराव नागरे, महेश गोविंदवार, अमिष दरक, अंकुश जिद्दी पाटील, कुणाल खर्जुले, योगेश संगेकर, विक्रम शिंदे, रुपेश कदम, विद्याधर मगर, शिवानंद वैद्य, नारायण डुरे, विठ्ठलराव भोयर, डॉ. सुधाकर लोमटे, रुखमाजी शिंदे, कृष्णकांत शेवाळकर, इंदेश काबरा, मनोज कावडे, अनिस बागवान, साजिद शेख, डॉ. सारंग देशमुख, वर्षाताई खंदारे, पुष्पाताई शिंदे, विकास ठाकूर, गजानन सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गुलाब भोयर यांनी तर आभार राहुल मेने यांनी मानले.

No comments:
Post a Comment