नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड
दर्यापूर -प्रतिनिधी दिपक मेश्राम
युवा नेतृत्वाला चालना देत पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हा त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पावती मानली जात आहे.
नितेश वानखडे हे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांमध्ये कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम, संघटनात्मक कामे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवकांना बरोबर घेऊन पक्ष अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आगामी काळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध लोकहिताचे उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. माजी पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर खासदार बळवंत भाऊ वानखडे ,जिल्हाध्यक्ष बबलू भाऊ देशमुख , माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप,दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्या मार्गदर्शनात युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांनी निवड केली

No comments:
Post a Comment