अनसिंग येथे हजरत मोहम्मद हनीफ मस्तान सैलानी सरकार यांचा ११ वा उर्स सोहळा उत्साहात संपन्न
अनसिंग :- नारायण सातव
(ता.२)येथील हजरत मोहम्मद हनीफ मस्तानी सैलानी सैलानी सरकार (रह. अलैह) यांचा अकरावा वार्षिक उर्स सोहळा ( ता.२९) मार्च ते ( ता.२) एप्रिल या कालावधीत मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला ह्यापाच दिवस चाललेल्या सोहळ्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले*
हजरत मोहम्मद हनीफ मस्तानी सरकार सैलानी दरबार उर्सची सुरुवात ( ता.२९ ) रविवारी परचम कुशाई आणि कुराण ख्वानीने झाली. ( ता.३० ) सोमवारी रात्री आयोजित मेहफिल-ए-समा मध्ये कव्वालीच्या सुरांनी भाविक मंत्रमुग्ध झाले, त्यानंतर शाही गुस्ल' चा विधी पार पडला. ( ता.३१ ) मंगळवारी निघालेल्या शाही संदलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी जोहरच्या नमाजनंतर खानकाह मधून संदल निघून दादा मस्तान येथे चादर पेश करण्यात आली, तर रात्री इशाच्या नमाजनंतर दर्गा शरीफमध्ये पारंपरिक पद्धतीने 'शाही संदल' अर्पण करण्यात आले.
भक्ती आणि ऐक्याचा संगम
सोहळ्याच्या चौथ्या दिवशी, ( ता.१) बुधवारी पुन्हा मेहफिल-ए-समाचा कार्यक्रम पार पडला तर( ता.२) गुरुवारला सकाळी साडेदहा वाजता 'कुल शरीफ' व 'दुआ-ए-खैर' करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी देशामध्ये शांतता, प्रगती आणि सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली. यासह पाचही दिवस भाविकांसाठी महाप्रसादचे चोख नियोजन करण्यात आले होते.
"हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोठा संदेश देणारा उपक्रम आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या श्रद्धेने यात सहभाग नोंदवला होता.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे मोहम्मद अशफाक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 'आशिक-ए-सैलानी' कमिटीचे सदस्य, पदाधिकारी आणि अनसिंग परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment