जिल्हा बँकेच्या महागांव शाखे अंतर्गत मोरथ ग्रा वि का सोसायटी खरीप कर्ज वाटपास प्रारंभ
(प्रतिनिधी अक्षय डोंगरे महागाव)
(महागाव पं स)यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, यवतमाळ अंतर्गत महागाव शाखेशी संलग्न मोरथ येथील ग्राम विकास सहकारी सोसायटी मार्फत महागांव तालुक्यांत पीककर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते तसेच मशागतीसाठी आवश्यक साधन सामग्री वेळेवर घेता यावी, यासाठी संस्थेच्या वतीने आर्थिक निधी वेळेत उपलब्ध करण्यात आला. शेतकरी हिताच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आल्याने मोरथ सोसायटी अंतर्गत सभासदांमधून आनंद व्यक्त होत आहे.
प्रारंभी टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना तातडीने उत्साहात पीक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेत सुरू करण्यास मदत होत होणार आहे. कर्ज वाटपामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.या उपक्रमासाठी शाखेचे निरीक्षक प्रदीप गजलवार,मोरथ संस्था अध्यक्ष मारोती जाटवा .सचिव गजानन गायकवाड, तसेच बँकेचे शाखा व्यवस्थापक गुघे साहेब , कॅशियर धनंजय मस्के, लिपिक अजय राठोड व रोहित फाळके यांनीही कर्ज वितरण प्रक्रियेत सहभाग नोंदविला. तालुक्यातून शेतकरी हिताचे उत्कृष्ट निर्णय घेणारी सहकारी संस्था म्हणून मोरथ सोसायटीकडे पाहिले जात आहे.

No comments:
Post a Comment