कोपरगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी.


पत्रकार:- मोहन जाधव

कोपरगाव :- 

               १४ एप्रिल रोजी कोपरगाव पॉवर हाऊस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मेहुल बोर्डे (निम्न स्तर लिपिक) यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सामाजिक परिवर्तनासाठी फुले-आंबेडकरी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यकारी अभियंता, संगमनेर आयु. प्रदीप वट्टमवार हे कार्यक्रमास पूर्ण वेळ उपस्थित राहून त्यांनीही मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून सुंदरदास फंड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर सखोल विवेचन केले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. धांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोनावणे, उपकार्यकारी अभियंता आयु. प्रदीप देहरकर तसेच स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनीही विचार मांडले. पांढरे यांनी समता व समरसता यांतील फरक स्पष्ट करत सामाजिक विषमता दूर करण्याचे आवाहन केले. वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे संचालक सीताराम खंडागळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर क्रांतिकारी कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाल्मिक सानप यांनी केले, तर सूत्रसंचालन हर्षद बावा यांनी केले. विशेष आकर्षण म्हणून वेदश्री सानप हिने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार फुलांच्या ऐवजी फुले-आंबेडकर विचारांची पुस्तके देऊन करण्यात आला, हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले. शेवटी स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन धनंजय बंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी योगेश सोनवणे, अल्केश वानखेडे, कैलास पवार, महादेव दिवटे, सतीश देसाई, शाहरुख सैय्यद, नाना गोरडे, मयूर अष्टेकर, संतोष पवार, चेतन वाघ, कुलदीप सुरतकर, प्रवीण कोळी, प्रवीण सानप, अविनाश कोल्हे, राजेंद्र निकम, अतुल वनकर, भाऊराव देशमुख, किरण झावरे, शाम ओढेकर तसेच महिला प्रतिनिधी पद्मिनी कराळे, शबाना तांबोळी, रश्मी ढोक यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment