सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन


महिला समुपदेशन केंद्रात मान्यवरांची उपस्थिती; सामाजिक समतेचा संदेश


प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..

सिल्लोड शहर पोलिस ठाणे परिसरातील महिला समुपदेशन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दोन्ही महान समाजसुधारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) डॉ. दिनेश कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे, पोलिस कर्मचारी तळेकर अण्णा, राठोड, विशाल पाईकराव, तसेच कल्पना बनकर मॅडम व सोनवणे यांची उपस्थिती होती.

महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक कल्पना बनकर व विशाल पाईकराव यांनी उपस्थितांना संबोधित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी समाजात शिक्षण, समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी या महान व्यक्तिमत्त्वांचे योगदान अधोरेखित केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा तसेच महात्मा फुले यांच्या शिक्षण आणि समाजसुधारणेच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व समुपदेशन केंद्राच्या सदस्यांनी महान व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Post a Comment