उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी जलसेवा – संवर्धनाचा सुंदर उपक्रम”



सेनगाव दि 17 ( प्रतिनिधी ) पांडुरंग होडबे

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.(येलदरी) येथील बीट निरीक्षक व्ही. बी. चाटसे व त्यांचे सहकारी वनमजुरांनी रोपवन परिसरात हा उपक्रम राबविला.उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी पक्ष्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने पुढाकार घेत विविध ठिकाणी पाण्याची भांडी ठेवून नियमित पाणी भरले जात आहे. यामुळे परिसरातील पक्षी, प्राणी यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांच्या जीवनरक्षणास मदत होत आहे.

वन विभागाचा हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविण्यात येत असून पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या कार्यात वनमजुरांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून इतरांनीही आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment