वाकोडी येथील शेतकऱ्यांचे तीन बैल व एक कारवड चोरी
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
वाकोडी येडोबा : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथील शेतकरी सर्जेराव नाईक ह्यांचे तिन बैलं व गजानन काकडे यांची एक पांढरी कारवड असे चार जनावरे ६ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरानी रात्री शेतातुन चोरून नेले आहेत.
वाकोडी ते गांगापूर रोडवर या दोन्ही शेतकऱ्यांचा आपल्याशेतामध्ये आखाडा असून या आखाड्यावर बांधलेले वरील जनावरे हे चोरानी रात्री चोरून नेले. कामावर असलेल्या सालगड्याने सकाळी या जनावरांचा पूर्ण परिसरात शोध घेतलाः मात्र ही जनावरे कोठे नजरी पडली नाहीत. यासंदर्भात गड्याने आपल्या मालकाला फोन करून संबंधित विषयाची माहिती दिली आहे. परिसरातील आखाडे यामध्ये सर्जेराव नाईक यांच्च्याआखाड्या वरुन तीन बैल गजानन काकडे यांच्य आखड्यावरून एक पाढर कारवड अशा प्रकारे अज्ञात चोरट्याने जनावरे चोरून नेले आहेत. जनावर मालकांन जवळपास संपूर्ण जनावरांच शोधाशोध केली पण सध्या अजून जनावराचा पत्ता लागलेल् नाही या संदर्भात शेतकऱ्यान कळमनुरी पोलीस स्टेशनल देखील कळवले आहे.

No comments:
Post a Comment