अ. भा. मराठी परिषदेचे उदगीरला आहे ४४ वे अधिवेशन.
मानोरा :-(जगदीश राठोड)
शहर व तालुक्यामध्ये विविध वृत्तपत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले पत्रकार हे देशातील सर्वात मोठ्या व जुन्या वृत्तपत्र संघटनेशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनात भाग घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे जाण्यासाठी आज प्रातःकाळी रवाना झाले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून उद्घाटन समूह संपादक राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रसिंहराजे भोसले हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर आ.संजय बनसोडे हे सह स्वागताध्यक्ष आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार असून मिलिंद आष्टीवकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भूषविला आहेत. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची राज्यातील पत्रकारांना या अधिवेशनात मार्गदर्शन लाभणार आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे वाशिम जिल्हा अध्यक्ष माधवराव अंभोरे तथा मानोरा तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे,माजी तालुका अध्यक्ष अशोक रत्नपारखी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मानोरा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकार बांधव उपरोक्त राष्ट्रीय अधिवेशन सहभागी होण्यासाठी आज सकाळी रवाना झालेत.

No comments:
Post a Comment