जि. प. उच्च प्राथमिक शाळा, खर्ची बु. येथे “रंगतरंग” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,खर्ची बुद्रुक येथे “रंगतरंग” या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल माळी उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील मान्यवर व्यक्ती व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी आशाबाई विठ्ठल महाजन (सरपंच), गोपाल माळी (शाळा समिती अध्यक्ष), योगेश चव्हाण (उपसरपंच), योगेश चुडामण माळी, शाळा समिती सदस्य, भुषण म्हस्के मराठा समाज सचिव, सजन दोधु माळी , भुरा लडा महाजन, , अर्जुन मराठे , कैलास मराठे ,दगडू माळी, आबा महाजन , गोपाल मराठे, सोपान माळी , नवल चव्हाण , इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गीत, लोकनृत्य, मराठी, अहिराणी , हिन्दी गाणी सादर करून उपस्थितांचे मन जिंकून प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. “रंगतरंग” या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून गावकऱ्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रेखा बाविस्कर, मुर्लीधर महाजन , प्रिती चौधरी , माधुरी बाविस्कर यांनी अथक परिश्रम घेतले. शाळेच्या वतीने उपस्थित रसिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.परिसरातून अनेक पालक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद यावेळी घेतला.

No comments:
Post a Comment