करमाळ्यात सोशल मीडियातील अफवा आणि पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या मोठ्या रांगा




करमाळा प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे

सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे करमाळा शहरात दिनांक 25 मार्च रोजी पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. पेट्रोलचा तुटवडा असल्याच्या खोट्या बातम्या पसरल्याने, वाहनधारकांनी टाक्या फुल करण्यासाठी झुंबड उडवली होती. यामागे इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर पेट्रोल, गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्याचा फटका भारतालाही बसत आहे. परंतु त्यांचाही होऊ नये, यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने देखील पेट्रोल डिझेलचा कोणता ही तुटवडा नसल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. तरी देखील नागरिक संभ्रमात असून, पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की, सायंकाळी पाच वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट करत, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान केले आहे. तरी नागरिकांमध्ये अध्याप संभ्रम कायम आहे. त्यामुळे दुचाकी तीन चाकी चार चाकी असे इतर ही मोठी वाहने पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा करून उभे आहेत.

" करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, सध्या शासनाकडून किंवा तेल कंपन्याकडून पेट्रोल व डिझेल तुटवडा असल्याबाबत अथवा पुरवठा खंडित होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अनावश्यक प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. अशा प्रकारच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम  यांनी  केले आहे.


No comments:

Post a Comment