केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेत किशन मुगळे यांचे यश; रायगड जिल्ह्यात सहावा क्रमांक

 


पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी  महाड प्रतिनिधी

महाड : रायगड जिल्हा परिषद शाळा कोंडीवते क्र. २ येथील उपशिक्षक किशन दिगंबर मुगळे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत १५९ गुण मिळवत त्यांनी रायगड जिल्ह्यात सहावा क्रमांक तर राज्यात २२९ वा क्रमांक मिळवला आहे.

रायगड जिल्ह्यात विभागीय परीक्षेद्वारे एकूण ११४ केंद्रप्रमुखांच्या जागा भरल्या जाणार आहेत. मुगळे हे गेल्या सात वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून शिष्यवृत्ती, मंथन व बीडीएस अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून कोंडीवते क्र. २ शाळेतील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहेत.

तसेच शिरगाव केंद्रात तंत्रस्नेही शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले असून या अनुभवाचा केंद्रप्रमुख पदाच्या परीक्षेत निश्चितच फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.

या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार तसेच शिरगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. नीलांबरी घोलप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment