राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित कविता पवार/राठोड....
प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे मेहकर
बुलढाणा:-गव्हर्मेंट ऑफ इंडिया द्वारे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम कडून सन 2025-26 वर्षा करिता बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा संघटन आयुक्त गाईड कु.कविता सकरुजी पवार/राठोड -लिडर ट्रेनर गाईड यांना "समाज भूषण पुरस्कार" शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये विशेष कौशल्य प्राप्त केल्याबद्दल प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालय मुंबई,येथे मी 2012 मध्ये रुजू झाले व तेथूनच माझ्या शासकीय प्रवासाला सुरुवात झाली.उस्मानाबाद व परभणी येथे कार्य केल्यानंतर स्वगृही यवतमाळ येथे जिल्हा संघटन आयुक्त गाईड म्हणून पदभार स्वीकारला. यवतमाळ जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्यामुळे तिथे कामाचा व्याप बराच होता.त्यात शिक्षण विभागातील अधिकारी यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली माझ्या कलागुणांना वाव मिळाला.तिथूनच माझे सामाजिक कार्याला सुरुवात झाली.माझे वडील श्री सकरुजी पवार हे मुख्याध्यापक त्यामुळे घरात शिस्तीचे धडे अंगवळणी पडले होते.स्काऊट गाईड अंतर्गत समुदाय विकास कार्यक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन,बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच सेवा उपक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरे,पाणपोई गुरांसाठी पक्षांना पाणी,अन्नदान धान्यदान, असे बरेच समाजोपयोगी उपक्रम मोठ्या प्रमाणात घेतले.Scout Guide Wagggs & Wosm International विषय अंतर्गत मुलांच्या मानसिक आरोग्य व न्यूनगंड कमी करून self esteem,body & self confidence वाढविण्यासाठी Free being me, stop the violence,Good touch-bad touch, मोबाईल संदर्भात अवेअरनेस करण्यासाठी Surf smart, मुलींमधील होणारी कुचुंबना न्यूनगंडता किशोरवयीन मुलींच्या समस्या Knowledge about Menstrual Period याबाबत कार्यशाळा घेऊन 5000 पेक्षाही जास्त मुलींना माहिती दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली कारकिर्दीमध्ये 312 मुली राज्य पुरस्कार प्राप्त झाल्या. पूर्ण जिल्ह्यातून 700 पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकांना प्रशिक्षण दिले. 2015 रोजी राष्ट्रीय स्तरावरील कर्नाटक मैसूर जांभोरी मध्ये तर डिसेंबर 2022 मध्ये पाली,राजस्थान व नोव्हेंबर 2025 मध्ये लखनऊ,उत्तर प्रदेश येथे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईडचे प्रतिनिधित्व केले. स्टेट कॉर्डीनर म्हणून कार्य करते. सामाजिक कार्या अंतर्गत भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था उपाध्यक्ष म्हणून कार्य सुरू आहे. Pay Back to Society PBSP मध्ये राष्ट्रीय स्तरावर सामाजिक बांधिलकी कर्तव्य व जबाबदाऱ्या लोकशाही मूल्याची रुजवणूक व फुले शाहू आंबेडकर विचारधारा व शैक्षणिक उपक्रमांतर्गत विविध कार्यामध्ये सक्रिय कार्य, तसेच पतंजली योग समितीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करते.कोरोना COVID-19 कालावधीमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे Yoga with BSG You Tube द्वारे लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता व प्रत्यक्ष योगा प्रशिक्षक म्हणून कार्य केले. माझ्या कार्यकिर्तीत 11 जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वीरित्या ते संपन्न झालेत. गेल्या दोन वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा संघटक गाईड म्हणून 70 स्काऊट गाईड यांना राज्यस्तरीय राज्य पुरस्कार परीक्षेसाठी मार्गदर्शन करून पात्र केले.राज्यस्तरीय परीक्षेला परीक्षक म्हणून कार्य केले. जिल्ह्यातील व तालुकास्तरावर संघनायक प्रशिक्षण शिबिरे उद्बोधन वर्ग याद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करते. या कार्यामध्ये विशेषतः माझे पती श्री लक्ष्मण मदन राठोड यांची सदैव साथ असते.माझे नातेवाईक व मित्रमंडळी यांचे मार्गदर्शन त्याचबरोबर माझे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून प्रेरणा मिळते. कार्यालयातील सर्व कर्मचारी पदाधिकारी,अधिकारी व जिल्हा स्तरीय स्काऊटर गाईडर यांचे मोलाची सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment