इरफान उगारे डायनॅमिक इंडिया अवार्ड ने सन्मानित


 प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत

 बुलढाणा येथे डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने देण्यात येणारा ह्या वर्षीचा डायनॅमिक इंडिया अवॉर्ड जत येथील श्री . इरफान उगारे यांना देण्यात आला . जत येथील रामराव नगर येथे स्थायिक असणारे इरफान उगारे हे गेली अठरा वर्षे क्लिनिकल लॅब च्या व रक्त पेढी च्या माध्यमातून रुग्ण सेवा देत आहेत .

 कोरोना सारख्या महामारीत तीन हजारच्या वर रुग्णांची कोविड तपासणी करून त्यांचा जीव वाचवण्यात मोलाचा वाटा आहे . इरफान उगारे यांनी आपत्कालीन वेळेत रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना अठरा वेळा आपले स्वतः चे रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवले आहे .रक्त पेढी च्या माध्यमातून त्यांनी रक्तदान शिबीर घेऊन जवळ जवळ पाच हजार रक्त पिशवीचे संकलन करून गरजू लोकांना ते वितरित केले आहे . क्रीडा क्षेत्रा च्या बाबतीत बोलायचे झालं तर क्रिकेट मध्ये , खो खो , कब्बड्डी मध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन केले आहे . पुरस्कार मिळाल्याद्दल इरफान उगारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment