कर्जाच्या तणावातून साळवा येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले


प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी : तालुक्यातील साळवा शिवारात कर्जाच्या तणावातून एका शेतकऱ्याने केल्याची आत्महत्या धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून साळवा गावावर शोककळा पसरली आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव दत्तराव डिगाबर माखणे (वय ४८) असे असून ते साळवा गावचे रहिवासी होते. त्याच्या - पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार असून मुलीचे लग्न झालेले आहे. त्याच्या नावावर साळवा - शिवारात सुमारे अडीच एकर शेती होती. शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीच्या - कामासाठी त्यानी कळमनुरी येथील भारतीय स्टेट बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र काही काळापासून शेतीतून - अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक अडचणी

वाढल्या होत्या. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हगामातील पिकाचे नुकसान झाले होते. त्यानतर रब्बी हगामातही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे कर्जफेडीची चिता त्यांना सतावत होती, अशी माहिती कुटुंबीयानी दिली. दरम्यान मंगळवारी रात्री शेतात जाऊन येतो असे सागून ते घरातून बाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयानी त्याचा शोध सुरू केला. शेतात पाहणी केली असता पल्हाटीच्या फासाजवळ जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्याचा मोबाईल फोन, पाण्याची बाटली आणि चप्पल पडलेल्या अवस्थेत आढळल्या. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे तसेच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.


No comments:

Post a Comment