घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथकाचा धडाका; दोन सिलेंडर केले जप्त
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी : तालुक्यातघरगुती गॅसचा व्यावसायिक ठिकाणी होणारा गैरवापर रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, २४ मार्च रोजी भरारी पथकाने विविध रेस्टॉरंट, खानावळी व धाब्यांवर धाडसत्र राबवले. या मोहिमेत एकूण नऊ ठिकाणी तपासणी करण्यात आली.
दोन तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर सुरू असल्याचे उघडकीस आले. संबंधित दोन्ही ठिकाणांहून गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून हे गॅस सिलेंडर एजन्सीकडे जमा करण्यात आले आहेत. व्यावसायिक असलेल्या गॅसऐवजी घरगुती गॅसचा वापर केल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.तालुकास्तरीय भरारी पथकात नायब तहसीलदार अमोल घुगे, फौजदार संतोष इंगळे तसेच गोदाम व्यवस्थापक पंकज चौधरी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातही याच पथकाने धाड टाकून अशाच प्रकारचा गैरवापर उघडकीस आणत कारवाई केली होती. तालुक्यातील हॉटेल, धाबे व रेस्टॉरंट चालकांनी घरगुती गॅसचा वापर टाळावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भरारी पथक प्रमुख नायब तहसीलदार अमोल घुगे यांनी दिला आहे. तसेच येत्या काळात धाडींची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे तालुक्यातील व्यावसायिकां मध्ये खळबळ उडाली असून, नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासना ने इशारा दिला आहे

No comments:
Post a Comment