करमाळा तालुक्यातील सात महिलांना जिल्हा परिषदेचा 'आदर्श पुरस्कार' प्रदान; महिला दिनी गुणवत्तेचा गौरव....



करमाळा प्रतिनिधी- जितेंद्र चांदगुडे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिला जाणारा, सन २०२५-२६ चा 'आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार' सोहळा सोलापूर येथे उत्साहात पार पडला. यामध्ये करमाळा प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ७ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल, आणि समाजातील माता व बालकांच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे.


पुरस्कार प्राप्त मानकरी खालीलप्रमाणे....


आदर्श पर्यवेक्षिका.... श्रीम. सुजाता धोंडीराम कांबळे (वरकुटे २)


आदर्श अंगणवाडी सेविका....


१. श्रीम. सुकेशिनी नानासाहेब काळे (सावडी, शिरोमणी मळा)


२. श्रीम. योगिता संदिप शिंदे (पोथरे, शिंदे वस्ती)


३. श्रीम. केशर हरिश्चंद्र शिंदे (केडगाव, धनवट वस्ती)


आदर्श अंगणवाडी मदतनीस....


१. श्रीम. सुरेखा नागनाथ आवटे (देवळाली २)


२. श्रीम. शिरीन सलीम शेख (गुळसडी, भंडारे वस्ती)


३. श्रीम. सुवर्णा देविदास जाधव (धायखिंडी)


आदर्श कामाची प्रशासनाने घेतली दखल....


         अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलन, लसीकरण, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि शासनाच्या विविध योजना, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या सेविकांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

          पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशीसो यांनी, करमाळा तालुक्यातील सात महिलांना जिल्हा स्तरावर गौरवण्यात आल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना ही नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment