सिद्धार्थ पब्लिक स्कूल च्या प्रांगणात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न




प्रतिनिधी - मोहसीन इनामदार 

 सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत या सी बी एस ई स्कूल मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय शिस्तबद्ध व नाविन्यपूर्ण उपक्रमाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माझी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दिसले सर तसेच सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ वैशालीताई सनमरीकर सचिव डॉक्टर कैलास सनमरीकर उपाध्यक्ष जाधव सर श्री उमाजीराव मेडिकल फाउंडेशन अध्यक्ष श्री भारत साबळे सर शाळेचे मुख्याध्यापक श्री के. शामसुंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत पडला. कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थी तसेच शिक्षकांनी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना करिअर च्या संदर्भात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजीराव डिसले सर म्हणाले की शाळेसोबत नाळ कायम राहू द्या शाळेने आपल्यासाठी खूप काही केले आहे त्याची जाणीव आपणास नेहमी असू द्यावे. डॉक्टर वैशालीताई सनमडीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करून यश संपादन कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे नेहमी आपणास सहकार्य असेल याची जाणीव निर्माण करून दिली. विद्यार्थी तसेच शिक्षक श्री नागेश खजिरे, सौ रंजना कांबळे, सौ नेहा मिस व प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करून संगीत तसेच चित्रफितीच्या माध्यमातून कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment