करमाळा तालुक्यातील मत्स्यव्यवसाय करणार्या विधवा महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शासनाने मदत करावी- पद्मजाताई इंगवले
करमाळा प्रतिनिधी:- जितेंद्र चांदगुडे
करमाळा तालुक्यात गेल्या एक-दोन वर्षांपासून विधवा महिलांसाठी विविध माध्यमातून समाजामध्ये मान-सन्मान मिळावा. तसेच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी व विधवा महिलांकडे जनमाणसाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. यासाठी शिवसेना महिला ओबीसी/ व्हिजेएनटी सोलापूर जिल्हाध्यक्ष पद्मजाताई इंगवले या सतत प्रयत्नशील राहिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उजनी धरणाच्या आसपास गावांमध्ये राहणाऱ्या विधवा महिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असुन, त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी. यासाठी श्रीमती इंगवले यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी विधवा महिलांसाठी पुढील महत्वाची मागणी केलेली आहे.
मौजे करमाळा ता. करमाळा जि. सोलापूर येथील उजनी धरणाच्या बॅक वॉटर शेजारील असलेल्या, गावातील आणि तेथे मत्स्यव्यवसाय करणार्या 60 विधवा महिला अत्यंत गरजवंत आहेत. त्यांना लहान-लहान मुले आहेत. मी एक विधवा महिला सक्षमीकरण राबवित असल्यामुळे, आम्हा विधवा महिलांना मान-सन्मान दिला जात नाही. व ती प्रथा बंद व्हावी यासाठी गावोगावी जाऊन विधवा महिलांना हळदी कुंकुवाचा मान देणे. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत असताना, उदरनिर्वाहासाठी होडी व मासेमारी जाळी हि उपकरणे आपल्याकडून संबंधित विधवा महिलांना मदत म्हणून देण्यात यावीत. आपल्या मदतीमुळे अनेक विधवा महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यात मदत होईल. तरी विधवा महिलांबाबतीत सरकारी पातळीवर योग्य ती कार्यवाही करुन, संबंधित विधवा महिलांना आपण आपल्या पातळीवर मदत करावी. अशाप्रकारचे निवेदन श्रीमती पद्मजाताई इंगवले यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.

No comments:
Post a Comment