हल्ला प्रकरणी आरोपी फरार, आंदोलनाचा इशारा




प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी

 कळमनुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेला सहा दिवस उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सदर हल्ला अज्ञात तीन व्यक्तींनी केल्याची माहिती असून, गेल्या सहा दिवसांपासून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या संदर्भात कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन

देण्यात आले आहे. येत्या सात दिवसांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम, संतोष इंगोले (युवा ता. महासचिव), जयभीम डोंगरे (युवा ता. सचिव), राष्ट्रपाल कोकरे (युवा ता. उपाध्यक्ष), ज्येष्ठ यशवंत नरवाडे, भगवान ढेपे, किरण पाईकराव, उमाजी चोपडे, बाळासाहेब पाईकराव, काशिनाथ साळवे, आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment