तडसर येथे वित्तीय साक्षरता सप्ताहा निमित्त FLW कॅम्प संपन्न



कडेगाव प्रतिनिधी मुकुंद सुकटे 

दि. 12/02/26 रोजी तडसर येथे सकाळी 10:30वाजता ग्रामपंचायत हॉल तडसर ता. कडेगाव जि. सांगली येथे CLF पाटण अंतर्गत (FLW) वित्तीय साक्षरता सप्ताह निमित्त FLW कॅम्प चे आयोजन करण्यात आले योगेश पाटील सरांनी बँके च्या विमा योजना पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना याविषयी मार्गदर्शन केले, कैलास सरांनी ऑनलाईन बँकिंग सुविधा वापरताना घेण्याची जागरूकता व तक्रार निवारण प्रणाली याविषयी माहिती दिली तसेंच केवायसी व रि केवायसी  याविषयी लोकांना मार्गदर्शन केले त्यांचे शंका निरसन केले केवायसी संबंधी व्हिडीओ दाखवण्यात आले ग्रामस्थांना केवायसी फॉर्म भरून देण्यात आले तसेच नवीन खाते काढणे, विमा काढणे, व AEPS ENABLE करून देणे इत्यादी कामे करून दिली व मार्गदर्शन केले. BOI कडेगाव शाखा यांच्या BC सखी सौ दीपाली सूर्यवंशी व बँक OF महाराष्ट्र कडेगाव शाखा च्या BC रेखा माळी मॅडम यांनी वरील कामे करून दिली सदर कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन crp श्रीमती मृणाली ताई महाडिक यांनी केले सदर कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी, crp सौ प्रतिभा पवार, सौ स्मिता पवार, पशुसखी सौ आश्विनी पवार वाळवा CLF चे ट्रेनर योगेश पाटील सर, पलूस ब्लॉक चे ट्रेनर कैलास सर तसेच dcc बँक तडसर शाखेच्या प्रतिनिधी बँक सखी संयोगिता कांबळे तसेच गावातील ग्रामस्थ ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment