मुर्तीजापुर मध्ये आगीचे तांडव योगेश निंबेकर या गरीबाचे घर जळून खाक.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मुर्तीजापुर मध्ये केसरी नंदन कॉलनी सिरसो रोड मूर्तिजापूर येथील योगेश निंबाळकर यांच्या घराला आज अंदाजे सकाळी 8:30 ते 09 वाजताच्या दरम्यान आग लागली सुदैवाने प्राणहानी टळली तरीपण योगेश निंबेकर या गरिबांचे घरांचे संपूर्ण नुकसान होत अंदाजे यांचे 2 ते 3 लाखाचे नुकसान झाले आहे,योगेश निंबेकर हे गरीब गृहस्थ व्यक्ती पाणीपुरीचा व्यवसाय करतात व ते केसरीनंदन येथे आपल्या परिवारा सोबत वरच्या मजल्यावर आपल्या परिवारासोबत राहतात,ते आज बुधवार दि. 11/02/2026 रोजी सकाळी अंदाजे 8 वाजता दरम्यान आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी ते शाळेमध्ये गेले होते, वापस घरी येऊन पाहतात तर घराजवळ लोकांची गर्दी होती व घराला आग लागली आहे आजूबाजूचे लोक आग विझवत आहे, हे दृश्य पाहून अक्षरशः योगेश निंबेकर यांच्या डोळ्यातून पाणी आले आग एवढी भयानक होती की आगीमध्ये घरातील सर्वच वस्तू अक्षरश: जळून खाक झाल्या यामध्ये त्यांचे काही महत्त्वाचे कागदपत्र फ्रिज,टीव्ही, कुलर, सोफा, दिवाण,कॅम्पुटर, लाकडी आलमारी, व बरिच महागडे वस्तू व कपडे व 25 हजार रु.असे जळून खाक झाले तरी त्यांचे अंदाजे 2 ते 3 लाखापर्यंत त्यांचे आर्थिक व नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी पटवारी यांना पंचनामासाठी पाठवले तसेच सिरसो ग्रामपंचायतचे ग्रामसेवक,सदस्य यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिल्या,अग्निशमन गाडीला फोन लावला असता गाडी आली नाही परंतु शेजारच्या व आजू बाजूच्या लोकांनी आग विझवली, या आगीमुळे आज एक कुटुंब उघड्यावर पडले आहे तरी शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची समस्त नागरिकांची व मालकाची ईच्छा आहे..

No comments:
Post a Comment