वाळूज पोलीस स्टेशनची मोठी कारवाई
अवैध पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त; गोळीबार प्रकरणी एक जण अटकेत!
प्रति.पांडुरंग गायकवाड
वाळूज (छ. संभाजीनगर) :
वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्रसाठ्यावर कारवाई करत वाळूज पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. पोलीस निरीक्षक शिवशरण पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय शितोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून गोळीबाराच्या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दिनांक 06/02/2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सरोज स्कूल शेजारी, पेडगाव छत्रपती संभाजीनगर येथील अक्षर शाफी सय्यद (वय 40 वर्षे) याने कोणतीही परवानगी नसताना जवळ बाळगलेले पिस्तूल व त्यामध्ये जिवंत काडतूस ठेवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली. यावेळी संशयिताने महेश यादव याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात महेश यादव यांच्या उजव्या पायाच्या मांडीस गोळी लागून ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमी महेश यादव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संशयित अक्षर शाफी सय्यद याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करत एक देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतुसे असा सुमारे ₹33,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेले पिस्तूल व काडतुसे सील करून त्यावर पोलिसांचे व पंचांचे सहीचे लेबल लावण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 212 सह कलम 3(25), 5(27), 25(9) भारतीय हत्यार कायदा तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवशरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय शितोळे व वाळूज पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पुढील तपास वाळूज पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. महत्वाचे धागेद्वारे हाती लागण्याची शक्यता

No comments:
Post a Comment