थायलंड-मलेशिया मध्ये झालेल्या ऑलिंपिक असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धा मध्ये अहिल्यानगरच्या कु.पै.प्रियज करपे याची दमदार कामगिरी
श्रीगोंदा प्रतिनिधी - प्रा.अशोक राहिंज
*"मंजिल उन्ही को मिलती है*
*जिनके सपनो में जान होती है*
*पंख से कुछ नहीं होता*
*हौसलों से उड़ान होती है।"*
'ऑलिंपिक असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत इंटरनॅशनल (रेस्लिंग कॉम्पिटेशन) कुस्ती स्पर्धा,२०२६ थायलंड-मलेशिया' येथे भरवण्यात आलेल्या स्पर्धेत भारताकडून पाठविण्यात आलेल्या संघात आपल्या गावचे सुपुत्र कु.प्रियज संतोष करपे याने ५५ किलो वजन गटात "रौप्य पदक" व "कांस्य पदक" अशी दुहेरी कामगिरी करत भारताची शान वाढवली. त्याच्या या अल्पावधीतच केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन.!!
प्रियजला या यशामध्ये त्याला मिळालेले मार्गदर्शन वडिल तथा कोच मा श्री पै.संतोष तात्या करपे यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन करावे लागेल. एका सामान्य कुटुंबातील पैलवान,कोणताही अनुभव-ओळख नसताना, आपल्या खेळाच्या कौशल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जावून कुस्ती करणे,वाटते तितके सोपे नाही.तात्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी अखंड मेहनत, चिकाटी व अथक परिश्रमाची किंमत संतोष करपे(तात्यांना) मोजावी लागली.
जसे म्हणतात की, 'उत्तम मुर्तीकाराने घडविलेली सुंदर मुर्ती आपल्याला दिसते पण त्या मुर्तीकाराचे हात आपल्याला दिसत नसतात.'आपल्या सकारात्मक विचार आणि दृढ इच्छाशक्ती यांचे एक मुर्तीमंत उदाहरण तात्यांनी आज आपल्या समोर सादर केले.
प्रियज करपे याचे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण देशातून व अहिल्यानगर जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे.तसेच श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री व माजी आमदार श्री.बबनराव(दादा) पाचपुते तसेच विद्यमान आमदार श्री.विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment