मिराताई राजेंद्रजी बोडें नारीशक्ती राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मानित.



 वैदर्भीयनाथ चॅरिटेबल ट्रस्ट, कारंजा (लाड), जि. वाशिम यांच्या वतीने १८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात शेलूबोन्डे व सध्या मूर्तिजापूर येथील मिराताई राजेंद्रजी बोडें यांना समाजसेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार" देण्यात आला,

 गेल्या अनेक वर्षांपासून वैदर्भीयनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी उपक्रमांत सातत्याने कार्यरत आहे. समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा ट्रस्टने जपत असून, त्याच परंपरेत या वर्षी मिराताई बोडें यांची निवड करण्यात आली.मिराताई  आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळे मध्ये दरवर्षी गरीब विदयार्थ्यांना शालेय साहित्य, देणगी व देत असतात, सोबतच  सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे,  स्वच्छता अभियान मध्ये  सहभाग तसेच वृक्ष लागवड करण्यामध्ये व ईतरही समाजहिताच्या उपक्रमात सक्रिय सहभाग तसेच विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन समाजासाठी मोलाचे योगदान देत आहे.आपले पती गेल्यावर अगदी मुले चार, पाच वर्षाचे असतांना कोणाचाही आधार नसताना स्वतः शेतकरी असून आपल्या मुलांचे शिक्षण करून मुलगा डॉक्टर, व मुलगी सि. ए चे शिक्षण घेत आहे, हे कार्य खरोखर फक्त एक नारीच करू शकते, हे कार्य इतरांसाठी एक आदर्श असू शकते म्हणून त्यांची नारीशक्ती पुरस्कारसाठी निवड करण्यात आली तसेच  त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ट्रस्टने त्यांना  नारी शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार कारंजा,मानोरा विधानसभा आमदार सईताई डहाके व ईतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते  शाल,श्रीफळ,प्रशस्ती पत्र, पुरस्कार तालिका देऊन गौरवण्यात आले,ट्रस्टचे सचिव श्री. एकनाथ पवार यांनी  त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. सईताई प्रकाशदादा डहाके (कारंजा/मनोरा विधानसभा क्षेत्र), जोतीषाचार्य सागर देशमुख महाराज,डॉ. पंकज काटोले,पुंडलीक गोसावी, दिलीप टीकडे, विजय तेलगोटे, ओंकार मालवळकर, शारदाताई भुयार, आशाताई मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते,

या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून मिराताई बोडें यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचे शेलू बोडें गावकरी मंडळी, जि. प शाळा शेलू बोडेंचे शिक्षक, नातेवाईक,मित्र परिवार  यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, मिराताई बोडें यांनी हा पुरस्कार स्वर्गीय पती राजेंद्रजी बोडें मुलगा डॉ. अथर्व व  मूलगी अनुष्का यांना व सर्व परिवाराला  समर्पित केला आहे

No comments:

Post a Comment