दिव्यांग बांधवांना यू.डी.आय.डी.कार्ड मोहिम व प्राथमिक तपासणी शिबिर..



प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव 

जिल्हा परिषद नाशिक आणि पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यामाने व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (भाप्रसे ) ओमकार जी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून महत्वकांक्षी "स्वावलंबी" नासिक उपक्रमांतर्गत दिव्यांग शिबिराचे आयोजन वैनतेय विद्यालय व जुनिअर कॉलेज, बस स्टँड जवळ, निफाड या ठिकाणी येथे आयोजित करण्यात आले आहे.

 या शिबिरामध्ये ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे यु.डी.आय.डी.कार्ड नसेल आशा लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या लाभार्थ्यास  प्रमाणपत्र व कार्डची नोंदणी करण्यात येणार आहे.तसेच दिव्यांग बांधवांची यु.डी.आय.डी.ची सर्व प्रक्रिया आधारबेस असल्याने आधार कार्ड नंबर ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. व नोंदणी करिता लिंक केलेल्या मोबाईल क्रमांक सोबत आणावे. 


यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

१) आधार कार्ड  २) रेशन कार्ड ३) पासपोर्ट साईज फोटो ४) बी टू साइज फोटो  ५) शाळेच्या विद्यार्थ्यांनी बोनाफाईट आणावे 

 दि.१८.१२.२०२५ रोजी स. ९.३० वा. कार्यक्रमाला सुरु होईल.

 *कार्यक्रमाचे स्थळ*: वैनतीय महाविद्यालय व जुनियर कॉलेज,बस स्टँड जवळ निफाड 

तरी सर्व दिव्यांग बांधवांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त स्वरूपात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.   श्रीमती नम्रता जगताप गटविकास अधिकारी पंचायत समिती निफाड व सुनीलजी पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स. निफाड यांनी केलेले आहे.

टीप : ज्या दिव्यांग लाभार्थीकडे युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र आहे त्यांनी या शिबिरास उपस्थित राहू नये





No comments:

Post a Comment