राही तर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड : महाड तालुक्यातील मोहोप्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात "राही मोफत आरोग्य शिबिर" दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 ते 7.00 या वेळेत पार पडले. रायगड आयुर्वेद हेल्थकेअर इन्स्टिट्यूट RAHI, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि रायगड कॉलेज ऑफ फार्मसी चे संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबीर दरम्यान बालक, वयोवृद्ध महिला पुरुष असे एकूण 65 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात सर्दी, ताप, खोकला, त्वचा विकार, पोटदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा इत्यादी सर्वसाधारण आजारांवर अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली गेली. तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधे दिली गेली. ग्रामस्थांचा या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच मोहोप्रे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

No comments:
Post a Comment