मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवणार :-जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया



दर्पण न्यूज:- नेवासा प्रतिनिधी  नाथाभाऊ शिंदे 

महाराष्ट्र राज्य शेत व  शिव पाणंद रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष शरद पवळे आणि राज्याचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व शेत रस्ता समस्याग्रस्तांची बैठक घेतली. त्यानंतर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर पंकज आशिया  यांना नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावनी अहिल्यानगर जिल्ह्यात तातडीने करावी, या मागणीचे निवेदन नुकतेच दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दिले. निवेदन स्वीकारताना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सहानुभुतीपूर्वक संवाद साधत जिल्ह्यातील सर्व 14 तहसीलदारांना  या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याचीआदेश देण्याचे आश्वासन दिले. जिल्हाभरातील विविध तालुक्यांमधून आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारून व पाहून जन न्याय दिना प्रमाणे सर्व शेतरस्ता समस्याग्रस्तांचे प्रश्न समजावून घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धीचा हा नारा देत शेत रस्ता चळवळीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

मुख्यमंत्री बळीराजा शेत व पानंद रस्तायोजनेची अंमलबजावणी करावी, असे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात रस्त्यासाठी लागणारी निशुल्क मोजणी आणि पोलिस बंदोबस्त, सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून मजबुतीकरण करणे, गतिमान पद्धतीने काम करण्यासाठी शेतरस्त्यांसाठी १०० टक्के यंत्रसामग्रीचा वापर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, दगडी नंबरी लावणे, गाळ, माती, मुरूमासाठी कोणतेही स्वामित्व शुल्क आकारू नये, झिरो पेण्डसी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना चळवळीच्या वतीने देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्याचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील, सुरेश वाळके, रवींद्र खुडे, पोपट शेळके, बाळासाहेब थोरात, सचिन शेळके, अशोक कचरे, संजय साबळे, भाऊसाहेब वाळूज, बबन गुंड, दशरथ वाळूज, विठ्ठल निर्मळ, आशाबाई वाघ, उषाताई हुके, कानिफ कदम प्रशांत चौधरी देविदास शिंदे, आदिंसह नेवासा पारनेर, पाथर्डी, राहता इत्यादी विविध तालुक्यातील शिवपाणंद चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment