चिंचोली माळी येथे रोहन गलांडे यांचे बेमुदत अमरण उपोषण सुरू
प्रतिनिधी गोकुळ (आण्णा) गुरव
चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक (नागबेट वस्ती) संत नामदेव महाराज मंदिरा पर्यंत रस्ता व नालीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच केस तालुक्यातील विहीर गाय गोठा घरकुल योजनेचे हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी उपोषणातून करण्यात आली आहे. यासोबतच चिंचोली माळी ग्रामपंचायत हद्दीतील संत नामदेव महाराज अतिक्रमण हटवण्यात यावे
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जुन्या व नव्या इमारतीच्या बांधकाम व पुनर्विकासासाठी 2015ते 2025 या कालावधीत प्राप्त व खर्च झालेल्या निधी माहिती देऊन चौकशी करणे महाडीबीटी अनुदानाचे प्रलंबित लाभ शेतकऱ्यांना तात्काळ द्यावीत गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करावे आणि मागण्या करण्यात आल्या आहेत दि 11 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदारांना निवेदनद्वारे सादर केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात तसेच चिंचोली माळी ते हदगाव रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी यावरून उपोषण सुरू करण्यात आले आल्याचे रोहन गलांडे यांनी सांगितले आले मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment