अखेर लाल झेंडाच जिंकला बँके अधिकारी नमले, निवडणूकीच्या तोंडावर लाल बावटा चमकला,




प्रतिनिधी अक्षय डोंगरे महागाव 

 दिनांक 30/12/2025 रोज मंगळवार दुपारी  2 ते 4 वाजेपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आवाहनानुसार हातात लाल झेंडा घेऊन खेडोपाडीचे बँकांनीं त्रस्त केलेले शेतकरी कॉम्रेड डी बी नाईक आणि देविदास मोहकर या जिवलग जोडीच्या नेतृत्वावर तालुक्यातील शेकडो पुरुष व महिला तहसील कार्यालयात एकच गर्दी केली, सोबत अत्यंत तालासुरात डफाचे आवाज आणि टुमदार नृत्याने तर संपूर्ण परिसर दानानन सोडले, इन्कलाब जिंदाबाद, किसान सभेचा विजय असो,, या घोषणा गगनभेदी होत्या,, तहसील प्रशासनाने लेखी नोटिस 2 वाजेची देऊनही बँक अधिकारी 3 वाजेपर्यंत आलेच नाही तेव्हा मात्र आंदोलक आणि प्रशासनात तणाव दिसत होता, यावर तहसीलदार अभय मस्के साहेब आणि कॉम्रेड डी बी नाईक यांचे फोनवर बोलणे झाले कीं उद्या परत बैठक लावू परंतु आंदोलकांनी उद्यापर्यंत हे धरणे आंदोलन चालूच ठेऊ अशी भूमिका घेतल्यामुळे मात्र API कायंदे साहेब,पोलीस प्रशासन आणि उपस्थित नायब तहसीलदार पराते साहेब यांची तारांबळ उडाली,यात पराते साहेबांनी सर्व बँक मॅनेजर यांचे फोन नंबर उपलब्ध करून तात्काळ आदेश देऊन बोलावून घेतले आणि कॅबिन मध्ये बैठक घेतली या बैठीकीमद्ये एस बी आय वगळता सर्वच बँक अधिकारी आम्हांला सुस्पस्ट आदेश आलेले नाही, आम्हांला वेळ द्या, असे मुजोरी बँक अधिकारी करीत असतांना तहसीलदार पराते यांनी आंदोलकांचे शिष्टमंडळ आतमध्ये बोलाविले, तेव्हा आंदोलक डी बी नाईक यांनी लक्सात आणून दिले कीं आम्ही दिलेले संदर्भ शासन जि आर दिनांक 26/11 व दिनांक 28/11/2025 प्रमाणे कर्ज वसुलीला स्थगिती आणि कर्जचे पुनरगठन करण्याच्या सूचना असतांना आपण थकीत खातेदारांच्या खात्यामधून विड्रॉल कां देत नाही, आता जर तुह्मी सक्तीने कर्ज कपात करून खातेदार नियमित कराल तर तों कर्जमाफी ला मुकणार आहे कीं नाही या बाबत तुमी आता मुख्यमंत्री यांना पुन्हा slbc लावायला सांगणार कां? 10 ऑक्टोबर पासून तुह्मी वरिष्ठतांना भेटलेच नाही कां, आता वेळ नको आपण या जि आर नुसार एक तर विड्रॉल द्या नाही तर त्याच विड्रॉलवर नकार देऊन शाक्षॅंकिंत करा असे ठोस मुद्दे आंदोलक डी बी नाईक यांनी विचारताच सर्व बँक अधिकारी यांचे धाबेदाणाणले मग मात्र सर्व वातावरण बदलूनच गेले,, शेतकरी नेते डी बी नाईक यांनी बँक अधिकारी यांना सूचना केली कीं आता तुह्मी बाहेर आंदोलकासमोर जाहीर करा कीं उद्यापासून कोणतीच बँक कोणतीच रक्कम थकीत शेतकऱ्यांची               अडवीणार नाही, तेव्हाच आम्ही धरणे आंदोलन मागे घेऊ,,असे जाहीर केले 

बाहेर डफड्यांचा निनाद आणि आतमध्ये शब्दांचा विवाद असे या जिगरबाज आंदोलनाचे स्वरूप आज पाहवयास मिळाले,, अखेर एस बी आय चे रोशन शिरभाते साहेब, युनियन मुडांना व महागांव बँकेचे विनयराज टेनकाळे साहेब, आणि किरण सावळे साहेब तसेच सेंट्रल बँक फुलासावंगी नागदीवे साहेब आणि सवना सूरज खाडे साहेब यां सर्वांच्या वतीने विनयराज टेनकाळे साहेब आणि रोशन शिरभाते साहेब यांनी आंदोलकासमोर येऊन जाहीर केले कीं उद्या पासून थकीत शेतकऱ्याचे कोणतीही थकीत कर्ज कपात न करता विड्रॉल देण्यात येईल,,असे जाहीर करताच,, आंदोलकांनी शेतकरी एकता जिंदाबाद च्या जोरदार घोषणाबाजी केली आणि एका कुशल नेतृत्वामुळे केवळ महागांव तुलुक्याचाच प्रश्न सुटला नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात या मार्क्सवादी कम्युनिस्ट आंदोलनाची धग पोहोचणार आहे,, आता जिल्ह्यात महागांवच उदाहरण देऊन जिल्हातील गरीब थकीत शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो,, सोबतच नायब तहसीलदार पराते यांनी अतिवृष्टी झालेल्या व अतिक्रमन कायम प्रस्तावं राहूर, साधूनगर, वडद, चिंचोली,सह तालुक्यातील सर्वच गावचे मुद्दे उद्या तहसीलदार मस्के साहेब यांच्या समक्ष 3 वा योग्य ती पुढल कार्यवाही करण्यात येईल असेही जाहीर केले,,

या एक दिवशींय धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड पांडुरंग मुडे, गणेश तिघलवाड,दिलीप भिसे, तारा चव्हाण, शिवा गोपनवाड, शादत खान, मारोती हुलकाने, रमेश जाधव, प्रभाकर पाटील, मुरली पवार, अनिल राऊत, लक्समन खुपसरे, शाम चंदू राठोड, गजानन वानोळे, दत्ता धुमारे, मनोज जाधव, प्रताप राठोड, अशोक महाराज,बाळू रणमले, प्रकाश ढगे, अमोल राठोड, सोनू पवार, सह प्रमुख कार्यकर्ते सक्रिय होते मा क पा च्या एक दिवशींय धरणे आंदोलनाला मोठे यश.

उद्यापासून थकीत शेतकऱ्यांचे ही विड्रॉल होणार,,, हे धरणे आंदोलन जिल्हाला दिशा देणार,,,,


No comments:

Post a Comment