आयडीयल इंग्लिश स्कूल, शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कुलची टिकूजी - नि - वाडी (फन रिसॉर्ट) ठाणे येथे शालेय वार्षिक सहल
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयडीयल इंग्लिश स्कूल व शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल, महाड यांच्या वतीने ठाणे येथील टिकूजी-नि-वाडी (फन रिसॉर्ट) येथे एकदिवसीय शालेय सहल आयोजित करण्यात आली होती. महाड ते ठाणे फन रिसॉर्टला सहभागी ३०० विद्यार्थी, १८ शिक्षक आणि कर्मचारी ८ बसेस करून खूप धमाल, मौज मस्ती करत सकाळी १०.३० वाजता रिसॉर्टला पोहचलो. सकाळी १०:३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य व सुशोभित परिसरात आनंददायी वेळ घालवला.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी अम्युझमेंट पार्क–१ मधील फनी बनी, जायंट व्हील, फ्लाइंग कॅसल, स्पेस शिप, फ्रॉग राइड, व्हर्लविंड चेअर, सुपर जेट, ड्रॅगन शिप, डक ट्रेन व डॅशिंग कार या राइड्सचा मनमुराद आनंद घेतला. तसेच अम्युझमेंट पार्क–२ मध्ये वर्म कोस्टर, कॅरॉसेल, किड्स डॅशिंग कार, पायरेट शिप, हेलिकॉप्टर, फेरी ट्रेन, ड्रॅगन वॅगन, आईसक्रीम कप, सफारी ट्रेन, मिनी कोलंबस, फॅमिली ट्रेन, क्लायंबिंग कार, अॅनिमल किंगडम, स्पिनिंग कोस्टर, युएफओ सायकल, प्ले स्टेशन, तोरा-तोरा व पेंडुलम अशा विविध आकर्षक राइड्सचा अनुभव घेतला.
हिरवाईने नटलेला परिसर, शांत वातावरण व स्वच्छतेमुळे ही सहल अधिकच संस्मरणीय ठरली. विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, चहा-कॉफी व दुपारच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच निसर्गाचा आनंद, सहकार्याची भावना व शिस्तीचे महत्त्व अनुभवता आले. रात्री भिवंडी दरबार येथे विद्यार्थ्यांना खास मेजवानी देण्यात आली.
प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली १८ शिक्षक व सहलीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सहल सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पडली. सहभागी सुमारे ३०० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साहामुळे ही सहल कायम स्मरणात राहणारी ठरली.

No comments:
Post a Comment