भंडारी हायस्कूल मालवण आज स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण संपन्न



मालवण दि 19

मालवमध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सवी भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे भंडारी हायस्कूल आतापर्यन्त 128 वर्षे सातत्याने ज्ञानदानाचे कार्य करत आहे. भंडारी हायस्कूल ही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी संस्था मानली जाते. या संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम आज पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक मान. सतीश लळीत आणि प्रमुख पाहुणे म्हणून मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्याम चव्हाण तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सहखजिनदार अभिमन्यू कवठणकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर तसेच पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. सुमन आडवलकर उपस्थित होते

      या वेळी बोलताना मा.श्याम चव्हाण यांनी आपल्या कोकण किंवा महाराष्ट्रातून UPSC, किंवा MPSC परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग नगण्य असल्याबाबत खंत व्यक्त केली तसेच शाळेचे विध्यार्थी नसूनही ते विध्यार्थी दशेत असताना त्याना या शाळेचे लाभलेल्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला तर मान. सतीश लळीत यांनी UPSCकिंवा MPSC तसेच नागरी व संरक्षण सेवांसाठी असलेल्या विविध स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बनसोडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दळवी सर यांनी केले सूत्रसंचालन.श्री. प्रफुल्ल देसाई यांनी केले मुलांचे विविध गुणदर्शनाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम 19 व 20 रोजी सादर होतील.

No comments:

Post a Comment