सनराइज योगा अ‍ॅक्टिव्हिटी बेनिफिट ह्युमन्स ग्रुप गडचांदुर ग्रुप ला 4 वर्ष पूर्ण



(प्रतिनिधी ) अनुराग बुजाडे 

योगा अ‍ॅक्टिव्हिटी बेनिफिट ह्युमन्स ग्रुप ला यशस्वीरित्या पूर्ण ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत योगाच्या माध्यमातून आरोग्य, शांती,सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.योगामुळे शारीरिक आरोग्य उत्तम राहते, मानसिक तणाव कमी होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नियमित योगाभ्यास हा आजच्या धावपळीच्या जीवनात अत्यंत गरजेचा आहे. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

या आनंदाच्या आणि प्रेमाच्या सणानिमित्त सर्वांना ख्रिसमसच्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रभु येशू ख्रिस्तांचा शांती, प्रेम, एकता आणि सेवाभावाचा संदेश आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येवो.या विशेष प्रसंगी सर्वांनी योग, आरोग्य आणि सकारात्मकतेचा मार्ग स्वीकारावा, हीच सदिच्छा.


No comments:

Post a Comment