लासलगाव च्या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून युवकांनी दिला सामाजिक संदेश
लासलगाव (वार्ताहर) गणेश ठाकरे
लासलगाव शहरातून जाणारा विंचूर प्रकाशा माहामार्ग क्रमांक ७ हा अत्यंत महत्वाचा व सततचा गजबजलेला रस्ता असून या रस्त्याची मोठ्याप्रमाणावर दुरावस्था झालेली आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले असून त्यामुळे दररोज लहान मोठे अपघाताच्या घटना घडत आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिकांच्या वतीने वारंवार मागणी करण्यात आलेली असून त्याबाबत सर्व दैनिकात बातम्या देखील झळकल्या आहेत.परंतु ढिम्म प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष वाढला आहे.
या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यातून होणारे अपघात व नागरिकांचा झालेला संताप बघूनलासलगाव येथील युवकांनी पुढाकार घेऊन या रस्त्यावरील विंचूर कोटमगाव चौफुली वरील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला असून या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे मटेरियल टाकळी(विंचूर)ग्रामपंचायतचे सदस्य राम बोराडे यांनी उपलब्ध करून दिले आहे.
या वेळी खड्डे बुजविताना महेश मोरे,राम बोराडे,कल्याण होळकर,संदीप उगले,राजू कराड ज्ञानेशवर नेटारे,चंदू बाबा मोरे,ओम चव्हाण,आकाश अहिरे,सुनील ठाकरे आदी युवक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment