1996 च्या माजी विद्यार्थ्यांंकडून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट
कन्नड प्रतिनिधी दि.20
एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत करण्याचे आवाहन 1996 आं. ब. मुलांचे हायस्कूल या व्हाट्सअप ग्रुपवर हिरालाल पाटील यांनी केले होते . त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन व्हाट्सअप ग्रुप वरील सर्व सदस्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. आज मराठवाड्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नं 1 मराठी व कन्नड नं 3 च्या पटावरील सर्व विद्यार्थ्यांना 1996 च्या बॅच इ.10 वी चे आ.बं.मुलाचे हायस्कुल चाळीसगांवच्या माजी विद्यार्थ्यांकडून जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.शैक्षणिक साहित्यात पॅड, चित्रकला वही, एक रेघी वही,चौकटा वही,कंपास, उजळणी पुस्तक,पेन,पेनपाऊच,रंग पेटी आदी साहित्य प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी धर्मराज खैरनार,राहूल डुकरे, सतिष कोळी, कल्पना सूर्यवंशी,सुवर्णा गायके, फरहीन पठाण सह कन्नड नं 1 मराठी व कन्नड नं 3 या शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
एकाच वेळी 9 ते 10 साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांंच्या चेह-यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.यावेळी दिलीप गायकवाड यांनी 1996 च्या बॅच सदस्यांचे कौतुक केले. यासारखे समाज उपयोगी उपक्रम त्यांनी नेहमी राबवावेत असे प्रतिपादन केले व सतिष कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन 1996 या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून त्यांच्या प्रेरणादायी उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की,1996 आं.ब. मुलांचे हायस्कूल चाळीसगाव या बॅचच्या सदस्यांनी आतापर्यंत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम दरवर्षी नगरपालिका शाळेत राबविण्यात आला आहे. मतिमंद शाळेला मदत तसेच पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत यासारखे उपक्रम ते दरवर्षी राबवत असतात.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा गायके यांनी केले तर आभार कल्पना सूर्यवंशी यांनी मानलेत.

No comments:
Post a Comment