अतिक्रमणाच्या विळख्यातील शेतरस्ता मोकळा !
नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे
वार्ता : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील सावरगाव येथील गाव जोड रस्ता अनेक दिवसांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. यामुळे येथील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. अखेरीस, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र राज्य शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीचे राज्य उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी पातुर तालुक्याचे तहसीलदार श्रीयुत डॉक्टर राहुल वानखेडे यांना दूरध्वनीद्वारे कळविले असता त्यांनी महसूल विभागा चे मंडल अधिकारी कडून तातडीने कारवाई करत हा रस्ता मोकळा केला, त्या मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्रस्त शेतकऱ्याने या रस्त्याच्या अतिक्रमणाबद्दल पातूरचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. अतिक्रमणामुळे या रस्त्याचा वापर पूर्णपणे थांबला होता. परिणामी, खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या गंजी शेतातच पडून होत्या.शेतकऱ्याला मिळाला मोठा दिलासा
इतकेच नव्हे, तर येणाऱ्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असलेली शेती मशागतीची कामे रस्त्याअभावी ठप्प झाली होती. अतिक्रमण हटवण्यासाठी महसूल प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे पाहून शेतकरी मधुकर इंगळे यांनी शिवशेतरस्ता पाणंद चळवळीचे उपाध्यक्ष श्रीनाथाभाऊ शिंदे पाटील यांचेकडे आपली व्यथा मांडली. या कार्यकर्त्यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तातडीने रस्ता मोकळा
{कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाच्या त्वरित कारवाईमुळे आमचे मोठे नुकसान टळले आहे.}
मधुकर इंगळे, शेतकरी सावरगाव,तालुका. पातूरकरण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत महसूल विभागाने तात्काळ पाऊले उचलली.मंडळ अधिकारी ढोरे, तलाठी इचे नळकांडे, आणि कोतवाल उमेश रामचवरे यांच्या महसूल टीमने अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या रस्त्याची पाहणी केली आणि त्वरित कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. रस्ता मोकळा झाल्यामुळे सावरगाव येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी महसूल अधिकाऱ्यांसह शेतरस्ता चळवळीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य शेत रस्ता व शिवपाल रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरद राव पवळे व कार्यकर्ते श्री बाळासाहेब थोरात कानिफनाथ कदम,कैलास दहिफळे, मुरलीधर जरे यांनीउपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे

No comments:
Post a Comment