आईच्या स्मृती प्रित्यर्थ नळविहीरा शाळेला दिला स्मार्ट टीव्ही भेट. - इंजिनियर रोशन पिंपळे यांचा उपक्रम .

 



   टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

  टेंभुर्णी येथील रहिवाशी तथा छत्रपती संभाजी नगर येथील प्रभालका इंजिनिअरिंगचे मालक तथा युनायटेड इंजिनिअरिंग असोसिएशन  चे राज्य कोषाध्यक्ष रोशन पिंपळे यांनी नवरात्रीनिमित्त आपल्या दिवंगत आईच्या स्मृती प्रित्यर्थ नळविहीरा ता. जाफराबाद येथील जिल्हा परिषद शाळेला एक 43 इंची स्मार्ट टीव्ही भेट दिला आहे. गेल्या नऊ दिवसापासून नवरात्रीची धूम सुरू होती. नळविहीरा येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन विनोद कळंबे यांनी त्यांचे मित्र तथा अभियंता रोशन पिंपळे यांना नळविहिरा  येथील जिल्हा परिषद शाळेला एक स्मार्ट टीव्ही देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री पिंपळे यांनी आपली दिवंगत आई कै.अलका प्रभाकर पिंपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवरात्रीचा मुहूर्त साधून नळविहीरा शाळेला ४३ इंची स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही भेट दिली. 

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर गाडेकर, सुनिल गायकवाड, परमेश्वर मोरे, अनिल मोरे, यांच्यासह मुख्याध्यापक शिवहरी नागरे,दत्तू मुनेमाणिक,सुनील अंभोरे काशिनाथ उखर्डे ,विनोद कळंबे दीपक चव्हाण, ज्ञानेश्वर झगरे,मंजुषा बकतकार, पूजा चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment