ग्रीन पॉवर शुगर कारखाना ६लाख मे, टन गाळप करणार कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्यातील पहिली उचल 3000 प्रति टन जाहीर मा, संग्रामसिंह देशमुख



कडेगाव प्रतिनिधी  मुकुंद सुकटे 

येत्या २०२५/२६ गाळप हंगामात ग्रीन पॉवर शुगर्स साखर कारखाना६ लाख मॅटिक टन उसाचे गाळप करणार असुन त्यासाठी योग्य अशी तोडणी वाहतक यंत्रणा सज्ज केली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. यावेळी गाळपास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल ३ हजार जाहिर करण्यात आली आहे पहिली उचल जाहीर करणारा ग्रीन पॉवर शुगर्स हा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.

गोपुज (ता. खटाव) येथील ग्रीन पॉवर शुगर्स 'साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ, बॉयलर अग्निप्रदीपन व काटा पुजन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सुविघ पत्नी सौ अपर्णाताई देशमुख व लोकनेते स्व. आमदार संपतरावजी देशमुख (आण्णा) यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, विलासराव देशमुख, जयदिप देशमुख, दत्तात्रय सुर्यवंशी, राजाराम गरुड, विजय पाटील सत्यजीत देशमुख शिवाजीराव मगर पाटील, विजयकाका पाटील, रोहीत पाटील, श्रीकांत निकम, प्रमुख उपस्थिती होते.

यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की अल्पावधीतच कारखान्याने सभासदांचा विश्वास कमावला आहे. परिसरातील सर्व शेतक्यांनी आपला ऊस गाळपासाठी आपले कारखान्यास पाठवावा. चालु गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास चागला दर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे. वेळेत जोडणी करून कारखानागळीतासाठी सज्ज करण्यात आल आहे. ग्रीन पॉवर शुगर्स कारखाना देशात प्रथम क्रमांकाचा पारदर्शक कामकाजाचा कारखाना होण्यासाठी आपन सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करायचा आहे.स्व.आ. संपतराव (आण्णा) देशमुख यांच्या निष्ठावंत कार्यकर्ते हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे लबाड आणि कुणाचे पैसे बुडवले अशी एकही व्यक्ती म्हणार नाही राजकारणात पातळी धरुन विकासच काम झालं पाहिजे अशी आम्हाला शिकवण आहे कोणत्याही कार्यकर्ताला समाजात मान खाली घालून देणार नाही कारखान्याची दररोज ४ हजार २०० टन गाळप क्षमता आहे आपन कारखाण्याला ऊस पुरवठा करुन सहकार्य करावे व्यवहाराची जबाबदारी माझी राहिल. युवा नेते विश्वतेज देशमुख म्हणाले की स्व. आ. संपतरावजी देशमुख आण्णा यांच्या आशीर्वादाने आपन समाजकार्य करीत असताना संस्था सक्षम करण्यासाठी सर्वांची साथ महत्वाची आहे. आगामी काळात युवा उद्योजक निर्माण करण्यासाठी आपन प्रयत्न करणार आहे जनरल मॅनेजर झुंजार आसबे म्हणाले की ऊस तोडणीसाठी २२५ चार चाकी वाहने १५० अंगद गाडी, ५० बैलगाडी व ३हार्वेस्टिंग मशिन सज्ज आहेत. नियोजनब्द कार्यक्रम तयार करण्यात आला असुन सर्व अधिकार व कामगार यांना योग्य सुचना देण्यात आल्या आहेत.


यावेळी लक्ष्मण कणसे, बालहरी देशमुख, राजाराम कुंभार, बिरू मस्के , दाजीराम मोहिते, रामभाऊ पवार, लक्ष्मण बकाळ, महेंद्र पवार, धोंडीराम महिंद, बाबासाहेब शिंदे, अशोक मुळीक, पोपट कळके, मंदाताई करांडे नाथा रेणुसे, संजय पवार, सचिन सावंत, जयवंत मदने, शंकरराव शेंडगे, हनमंतराव कदम, ज्ञानदेव करांडे, उत्तम चव्हाण, मोहन शिंदे, दत्तात्रय उथळे, सुर्यकांत खटावकर, राजू मदवाने, शितल सावळवाडे, राजेंद्र बर्गे, विश्वजीत पाटील, श्रेणिक पाटील, संकेत पाटील, नितीन सुर्यवंशी, भानुदास सुर्यवंशी, जनरल मॅनेजर झुंजार आसबे यांच्यासह सभासद ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर झुंजार आसबे यांनी तर अशोक मुळीक यांनी आभार मानले.


आण्णांच्या पोटी जन्म हेच सगळ्यात मोठे पद


मला आमदार खासदार या पदाची अपेक्षा नाही पदासाठी कधी काम काम केले नाही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली सर्व ताकद एका बाजूला व निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत मला एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली राजकारण व समाजकारण करत असताना लबाडी वापरून फेकून देणे असे कधी केले नाही स्व. आ. संपतरावजी देशमुख आण्णांच्या पोटी जन्म होणे हेच माझे सगळ्यात मोठे पद आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे


मा,संग्रामसिंह देशमुख -

 १४ हजार सभासदांच्या कर्जाची परतफेड कारखाना उभारणी करण्यात अनेक आर्थिक अडचणी आल्या यावेळी माझ्या १४ हजार सभासदांनी विश्वास दाखवून स्वताच्या नावावर कर्ज काढून कारखान्यासाठी पैसे उभे केले या सर्व कर्जाची परतफेड करण्यात आले आहे आता सभासद हाच कारखान्याचा मालक आहे आम्ही कोणाचेही पैसे बुडवले नाहीत असे संग्रामसिंह देशमुख यांनी सभेत सांगितले.गेल्या वर्षीचा २०२४/२५ चा ३५०रु शेवटचा हप्ता दिवाळी पूर्वी खात्यावर जमा होणार आहेतसेच टनेज ची साखर गटावर मिळणारसन २०२४-२५ गाळप करण्यात आलेल्या ऊसाचा शेवटचा हप्ता ३५० रु प्रति टन जाहिर करण्यात आला असून दिवाळी पूर्वी खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत एफ. आर. पी. पेक्षा जादा दर देण्यात आला आहे. तर सभासदांची साखर गटावर मिळणार असून कामगारांना एक पगार दिवाळी बोनस कारखाना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे

 यावेळी मान्यवर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment