शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का ! आमदार पूत्र मंगळवार दि ०७ रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश
कडेगाव प्रतिनिधी: मुकुंद सुकटे
पदवीधर मतदारसंघातून शरद लाड इच्छुक आहेत. त्यांनी मतदार नोंदणीही सुरू केली आहे. भाजपकडून पदवीधर मतदारसंघासाठी त्यांना संधी मिळणार का, याचीही चर्चा आहे.
शरद लाड भाजपमध्ये दाखल होणारःराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड मंगळवारी (ता. ७) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेश सोहळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी दोन वाजता होणार आहे.
चर्चा पूर्णविरामाला – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी पूर्वीच ठरले होतेः
काही दिवसांपूर्वी कुंडल येथे झालेल्या चर्चेदरम्यानच पक्षप्रवेश निश्चित झाला होता. आता त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होणार आहेत.
राजकीय समीकरणात बदलाची चिन्हेः
शरद लाड हे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असून भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
पक्षाचे नेते आणि आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड मंगळवारी (ता. ७) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेशकार्यालयात दुपारी दोन वाजता प्रवेश सोहळा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कुंडल येथे जाऊन शरद लाड यांच्याशी चर्चा केली होती, त्या वेळेसच पक्षप्रवेश निश्चित झाला होता. मात्र तो कधी होणार, याची चर्चा सुरू होती.
चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता ते मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात होणाऱ्या सोहळ्यात भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमवेतच तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही प्रवेश करणार आहेत.
पदवीधर मतदार संघाचे आमदार लाड यांची मुदत पुढील वर्षी संपत आहे. पदवीधर मतदारसंघातून शरद लाड इच्छुक आहेत. त्यांनी मतदार नोंदणीही सुरू केली आहे. भाजपकडून पदवीधरमतदारसंघासाठी त्यांना संधी मिळणार का, याचीही चर्चा आहे.
शरद लाड यांच्या भाजपप्रवेशामुळे पलूस-कडेगाव मतदार संघात भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. काही महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांत काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांच्यानंतर आता शरद लाड प्रवेश करत आहेत.
मुंबईत मंगळवारी दुपारी दोन वाजता भाजप प्रवेश सोहळा झाल्यानंतर शरद लाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्रवेश सोहळ्यासाठी पलूस-कडेगाव मतदार संघातून त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईला रवाना होणार आहेत.
No comments:
Post a Comment