गांधी जयंती आणि नवरात्री उत्सवातून संस्कार इंग्लिश मेडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश



 प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर

भुसावळ : संस्कार इंग्लिश मेडीअम स्कूल, वरणगांव येथे  नवरात्री उत्सव  व २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.  नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये  भारतीय सण - उत्सव ,परंपरा व त्या अनुषंगाने गीत गायन , नृत्य, गरबा ,लेझीम यासारखे कलाप्रकार  विद्यार्थ्यांमध्ये  रुजावेत यासाठी विद्यायालया तर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती विद्यालयतर्फे साजरी करण्यात आली. गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या उदात्त तत्वांना उजाळा देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा,चित्रकला ,घोषवाक्ये, रांगोळी, वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  प्राचार्य डॉ. शंकर वरखेडे यांनी सांगितले कि नवरात्री हा आम्हाला एकतेचा संदेश देणारा व अन्याविरूढ लढण्याची शक्ती प्रदान करणारा उत्सव आहे.तर मं.गांधीजींच्या कार्यातून आम्हाला सत्य व अहिंसेच्या मार्गाने क्रांती करण्याची शिकवण मिळते. लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनातून आम्हाला शेतकरी व सैनिक यांच्या अद्वितीय कार्याची महती जाणीव होते. नवरात्री उत्सवात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी चैताली मॅडम यांनी नवरात्रीचे महत्त्व स्पष्ट केले तर कुमुदिनी मॅडम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रा ढमढेरे आणि संस्कृती मराठे (इयत्ता ७ वी) यांनी केले. यावेळी उपप्राचार्या प्रातिक्षा बोंडे व कार्यक्रम समन्वयक  अंजली शिरतुरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment