उमरखेड येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे शिक्षक दिन साजरा




बाळासाहेब पवार उमरखेड (प्रतिनिधी)  

शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाची आणि संस्कारांची कदर करण्याचा दिवस. हाच संदेश अधोरेखित करत दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिवसेना (शिंदे गट) जनसंपर्क कार्यालय, उमरखेड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी आदरणीय शिक्षकांचा मान्यवर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी समाज घडविण्याची, भावी पिढीला योग्य दिशा देण्याची जी भूमिका पार पाडली आहे, त्याबद्दल त्यांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला ॲड. संजीवकुमार जाधव (शहर प्रमुख), कैलासराव कदम (उपजिल्हाप्रमुख), श्रीमती सपनाताई चौधरी (महिला शहर प्रमुख शिवसेना), ज्येष्ठ नेते अनिल अण्णा नरवाडे, ॲड. अजय पाईकराव (अनुसूचित जाती आघाडी प्रमुख) तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना वक्त्यांनी शिक्षक समाजाचे दीपस्तंभ असून राष्ट्रनिर्मितीचे मूळ आधारस्तंभ असल्याचे गौरवोद्गार काढले. समाजाला योग्य दिशा दाखविणारे आणि मुलांच्या मनामनात संस्कारांचे बीज रोविणारे शिक्षक हेच खरे राष्ट्रपुरुष असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक दिनाचा गौरवपूर्ण उत्सव साजरा झाला आणि शिक्षकांचा मान वाढविण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला.




No comments:

Post a Comment