मुख्यमंत्री साहेब ओला दुष्काळ जाहीर करा.... शिवसेना (उबाठा) चे उपविभागीय अधिकारऱ्याकडे मागणी
जितेंद्र गोंडाणे
कुही तालुका प्रतिनिधी
सततच्या पावसामुळे मांढळ,कुही,सह उमरेड विधानसभेतील शेतक-यांची पीके नेस्तनाबूत झालेली आहेत त्यामुळे शेतकरी जगवायचा असेल तर तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा या तालुक्यातील शेतकरी अती पावसामुळे देशोधडीला लागतील याची शासनाने दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना उबाठा उमरेड विधानसभा चे वतीने पाठविण्यात आले..
याप्रसंगी उमरेड विधानसभा प्रमुख प्रकाश वारे,विधानसभा संघटक इंजि.खुशाल लांजेवार, उमरेड उपतालुका प्रमुख श्रावण गवळी,उमरेड तालुका संघटक शमीउल्लाखाण पठाण, उमरेड शहर प्रमुख धनराज जिभकाटे, कुही तालुका प्रमुख प्रदिप कुलरकर, संघटक कवडु चाफले, युवा सेना कुही तालुका प्रमुख मयुर ढेंगे, गणेश ठवकर, धिरज फेंडर, अरून मेश्राम, उमेश धनविजय,उमेश कारेमोरे, सुरेश फळके, देवरावजी कुहीटे, रामकृष्ण हजारे, सिताराम डवरे, रविंद्र तोंडासे, रामेश्वर गिरडकर, नंदकिशोर वैरागडे, लता बनकर, प्रकाश शेरकी, नारायण पोरकुट, लक्ष्मण कांडारकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment