एसएनडी पॉलिटेक्निकला एनबीएचे मानांकन



येवला : तंत्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाने (एनबीए) मुल्यांकन करत गुणवत्तेच्या आधारे बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एसएनडी पॉलिटेक्निकला एनबीएचे मानांकन दिले आहे. यामुळे एसएनडी पॉलिटेक्निकच्या लौकिकात भर पडली आहे.

संपूर्ण देशभरात तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत सुरु असलेल्या विविध पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध निकषांप्रमाणे मुल्यांकन करून मानांकन दिले जाते. या मुल्यांकन प्रक्रीयेमध्ये एसएनडी पॉलिटेक्निकने सहभाग घेऊन आपल्या गुणवत्तेच्या आधारावर मानांकन प्राप्त करून घेतले. ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाबद्दल जागृती निर्माण करून विध्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात एक नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असते.

पॉलिटेक्निक शिक्षण घेत असतांनाच विविध कंपन्यांच्या मुलाखतीत निवड होऊन चांगल्या नोकरीच्या उपलब्ध होत असलेल्या संधी व त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे होत असलेले समाधान यामुळे राज्यस्थरावर एसएनडी निर्माण झाली. पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकची नवीन ओळख मधील कॉम्पुटर इंजिनिअरिंग,इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग या विभागांना एनबीएचे मानांकन प्राप्त झाले. या उत्तुंग यशाबद्दल शिक्षक आमदार किशोर दराडे, संस्थेचे कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी प्राचार्य उत्तम जाधव यांचा सत्कार करून सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विध्यार्थांचे अभिनंदन केले. एनबीए मानांकन प्रक्रीयेमध्ये प्राचार्य उत्तम जाधव, समन्वयक संदीप असुदे, विभागप्रमुख गणेश चव्हाण, शोराब शेख, संतोष खंदारे, रविकुमार ताकसांडे, जयंत केंगे, राहुल आहेर, उमर मुलानी आदींनी योगदान दिले.


स्पर्धेच्या युगात स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी विध्यार्थ्यांना आवश्यक असणारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण एस एन डी पॉलिटेक्निकमध्ये देतो. अनुभवी शिक्षक तसेच विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधा यामुळे ग्रामीण भागात असूनही आमचे पॉलिटेक्निक एनबीए च्या सर्व निकषांमध्ये पात्र ठरले.- प्रा. उत्तम जाधव, प्राचार्य, एस.एन. डी. पॉलिटेक्निक, बाभुळगाव


"ग्रामीण भागात एसएनडी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थी घडवले जातात. विद्यार्थ्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी होत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमधून एनबीएच्या सर्व निकषांमध्ये एसएनडी पॉलिटेक्निक पात्र झाले. त्यामुळेच हे मानांकन प्राप्त झाले हि संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.- रुपेश दराडे, कार्यकारी संचालक, जगदंबा शिक्षण संस्था


No comments:

Post a Comment