न्यू इंग्लिश स्कूल शिरूरच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस ४० हजारांची मदत.



 १९९७ च्या बॅचचा पुढाकार – मैदाना साठी पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामास मदतीचा एक हात..!

पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 

 प्राचार्य मचाले सर यांच्याकडे धनादेश सुपूर्त; शाळेच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन... शिरूर, “शाळेचा ऋणानुबंध आयुष्यभरासाठीचा असतो, आणि त्या ऋणाची फेड म्हणजेच खरं सामाजिक योगदान.”हेच जिवंत उदाहरण साकारले न्यू इंग्लिश स्कूल, शिरूरच्या १९९७च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी. त्यांनी रु. ४०,०००/- (चाळीस हजार रुपये) रक्कमेचा धनादेश शाळेच्या विकासकामांसाठी प्राचार्य मचाले सर यांच्याकडे औपचारिकपणे सुपूर्त केला.

शाळेकडून विकास कामांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत, माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी जमा करून ही रक्कम उभी केली. विशेष म्हणजे, "या पुढेही आम्ही शाळेच्या गरजांसाठी मदत करत राहू," असे त्यांनी स्पष्ट आश्वासन दिले.

शाळेच्या आतील मैदानाचे सौंदर्य वाढणार

या देणगीचा वापर शाळेच्या आतील मैदानात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने हा निधी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित माजी विद्यार्थी हाजी आसिफ शेख, मुनाफ शेख, महादेव कडाळे, शिवाजी दसगुडे , चंद्रकांत घोडके, समीर तांबोळीया सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्राचार्य मचाले सर यांच्याशी संवाद साधत, शाळे विषयीची आपुलकी व्यक्त केली. बालपणातील आठवणी, शाळेचे संस्कार व शैक्षणिक जडणघडण या सगळ्यांची मनापासून दखल घेतली गेली.

 प्रमुख देणगीदारांचे मनःपूर्वक कौतुक

या उपक्रमासाठी पुढील माजी विद्यार्थ्यांनी प्रमुख देणगीदार म्हणून सक्रिय सहभाग रवींद्र राक्षे, शरीफ शेख, डॉ. मच्छिंद्र खैरे, डॉ. संदीप वावळ, मच्छिंद्र मोटे, बाळासाहेब साळुंखे, मुनाफ शेख, हाजी आसिफ शेख, समीर तांबोळी, शिवाजी दसगुडे, अ‍ॅड. महेश जाधव, पोपटशेठ फलके या सर्व विद्यार्थ्यांनांचे कौतुक प्राचार्य मचाले सर यांनी या सर्व देणगीदारांचे वैयक्तिकरीत्या आभार मानत, त्यांचे मन:पूर्वक कौतुक केले.

“शाळेच्या आवाहनाला प्रतिसाद देणं ही केवळ औपचारिकता नाही; ती तुमची शाळे बद्दलची आपुलकी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे,” असे ते म्हणाले.ही मदत म्हणजे शाळेप्रतीचा आदरभाव, नुसती रक्कम नव्हे. १९९७ च्या बॅचने घेतलेला हा पुढाकार इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही एक प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. शाळेच्या विकासासाठी अशा अनेक हातांनी पुढे यावे, हीच या उपक्रमाची खरी शिकवण आहे.

शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा ४०,०००₹ निधीआतील मैदानात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी उपयोगप्राचार्य मचाले सर यांच्या कडे धनादेश सुपूर्त १९९७ च्या बॅचचे सातत्याने सहकार्याचे आश्वासनप्रमुख देणगीदारांचे कौतुक व शाळा घडवते माणूस, आणि माणूस घडवतो समाज न्यू इंग्लिश स्कूल, शिरूरच्या १९९७च्या बॅचने दिलेली ही मदत म्हणजे शाळे विषयीची ऋण संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.


No comments:

Post a Comment