धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथी जयंतीनिमित्त शिरूरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..!
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
शिरूर,धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शिरूरमध्ये अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरी केली जाणार आहे. या पावन निमित्ताने शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय, शिरूर (जि. पुणे) येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर शनिवार, दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे.शिबिराचे आयोजन समस्त शंभूभक्त शिरूर, घोडनदी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास 'शंभुराजे' हे प्रेरणादायी पुस्तक छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही भेटस्वरूप दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना भविष्यात कधीही रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाणार आहे, ही एक सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनव संकल्पना आहे.
या उपक्रमामागील हेतू म्हणजे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वधर्म, स्वसंस्कृती आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ, समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प.
शिरूरकरांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, रक्तदान करून समाजसेवेत आपला वाटा उचलावा, अशी आयोजकांनी कळकळीची विनंती केली आहे.
🩸 "रक्तदान हेच श्रेष्ठ दान!" — या विचाराने प्रेरित होऊन, या पुण्य कार्यात सहभागी व्हा आणि धर्मवीरांच्या स्मृतीला अभिवादन करा.
No comments:
Post a Comment