दिवा शहरातील अवैध बॅनर, होर्डिंग हटवा - विकास इंगळे



ठाणे-प्रतिनिधी अरविंद कोठारी


दिवा - गर्दीचे केंद्र असलेले दिवा स्टेशन परिसर आता स्वतःच्या यशाचे बळी ठरत आहे. शहरातील नागरिकरण जलद गतीने होत असल्याने येथे जाहिरातींचा स्फोट होताना पाहायला मिळत आहे, सर्वत्र बॅनर आणि होर्डिंग्ज उगवले आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी बहुतांश जाहिराती बेकायदेशीर असून ठाणे महानगरपालिकेच्या आवश्यक परवानग्या घेतल्या शिवायच प्रदर्शित केल्या जाता आहेत.

ह्या बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्जचा प्रसार हा केवळ शहराच्या सौंदर्याचाच प्रश्न नाही तर तो रस्ता सुरक्षेसाठी देखील एक मोठा धोका आहे. नियमांच्या अभावामुळे हे बॅनर आणि होर्डिंग्ज अनेकदा पादचाऱ्यांच्या मार्गात किंवा वाहनचालकांच्या दृश्यमानतेत अडथळा आणणाऱ्या ठिकाणी लावले जातात. यात भर तर काय शिक्षण संस्था नी सुद्धा जणू काही आपण अधिकृत असल्याचा आव आणत शहरभर अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावून दिवा शहराला विद्रुप करण्याचा वसा हाती घेतला आहे. तर ठा.म.पा कडूनही दर वर्षी अनधिकृत शाळांवर कारवाई करणार अश्या आशयाचे बॅनर अवैध ठिकाणी लावून स्वतः अनधिकृत कृती करतात. अशा संस्थांनावर सुद्धा शहर विद्रुपकरण्याच्या (defacesment of public property) कायद्याखाली कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील कल्याण ग्रामीण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विकास इंगळे यांनी व्यक्त केले.


 ठाणे महानगरपालिकेने या बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्जवर तात्काळ कारवाई करून सर्व बॅनर हटावण्यात यावेत व असे बेकायदेशीर बॅनर लावणाऱ्यांवरही (defacement of public property) कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी असे मत इंगळे यांनी व्यक्त केले.


No comments:

Post a Comment