काष्टी परिक्रमा सायन्स कॉलेजचा ९९.११% निकाल



 तालुका प्रतिनिधी- प्रा.अशोक राहिंज 

श्रीगोंदा तालुका येथील काष्टी मधील परिक्रमा सायन्स कॉलेजचा एच एस सी निकाल ९९.११% लागला आहे. दर वर्षी प्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

       मा.ना.श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट चे परिक्रमा सायन्स कॉलेज या विद्यालयाचा इयत्ता बारावी फेब्रु/मार्च २०२५ परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांचेकडून जाहीर झाला असून यामध्ये कॉलेज मध्ये जाधव भक्ती काशिनाथ हि ८४% गुण मिळवून प्रथम, चव्हाण कृष्णा यशवंत हा ८२% गुण मिळवुन द्वितीय आला असुन तृतीय क्रमांक कुलकर्णी तनिष्का अरुण व खामकर सिद्धी जीजाराम या विद्यार्थिनीने ८१% गुण मिळवले.

       अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळविला असून विद्यालयाचा एकूण निकाल ९९.११% एवढा लागला. तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, माजी नामदार बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव आमदार श्री.विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते, ॲकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते, मुख्य अति. कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड, अती.ॲकॅडमी डायरेक्टर डॉ.संजिवजी कदमपाटील,सायन्स कॉलेज प्राचार्य डॉ. पांडुरंग इथापे,तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, , इंजीनिअरिंग प्राचार्य मोहन धगाटे, एम.बी.ए. डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ डी.फार्मसी प्राचार्य रमेश शिंदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक प्रगतीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment