परीट (धोबी) समाजासाठी एससी आरक्षणाची मागणी तीव्र


 

रांजणगाव गणपती येथे राज्यस्तरीय मेळाव्यात एकवटला समाज...खंडेराव कडलक यांचा निर्धार – अन्यायाविरोधात संघर्षासाठी सज्ज राहा; समाजभूषण व आदर्श माता पुरस्काराने गौरव..!


पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 

शिरूर,परीट (धोबी) समाजासाठी एससी आरक्षणाची मागणी तीव्र; रांजणगाव गणपती येथे राज्यस्तरीय मेळाव्यात एकवटला समाज...

खंडेराव कडलक यांचा निर्धार – अन्यायाविरोधात संघर्षासाठी सज्ज राहा; समाजभूषण व आदर्श माता पुरस्काराने गौरव..!

रांजणगाव गणपती, ता. शिरूर| “अन्यायाविरुद्ध लढा हा आमचा धर्म आहे, आणि हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत समाज गप्प बसणार नाही,” असा ठाम इशारा महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष खंडेराव कडलक यांनी दिला. परीट समाजाच्या अनुसूचित जाती (एससी) मध्ये समावेशाच्या मागणीसाठी राज्यभर एकत्र येण्याचे आणि आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र परिट सेवा मंडळाच्या पुणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित समाजबांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. रांजणगाव गणपती येथे पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार ॲड. अशोक पवार व  मनिषा ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाले.

मागणीचा इतिहास – अन्यायाचा संघर्ष...

खंडेराव कडलक म्हणाले, “साठ वर्षांपूर्वी परीट समाज एससीमध्ये होता, मात्र शासनाने त्यातून वगळून इतर मागासवर्गात टाकल्याने मोठा अन्याय झाला आहे. आजही हा विषय शासन दरबारी प्रलंबित आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, “शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात समाजाला संधी मिळाव्यात म्हणून हे आरक्षण अत्यावश्यक आहे.”

त्यांनी समाजबांधवांना संघटित होण्याचे आवाहन करत सांगितले की, “आपल्याला हक्कासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, संघर्षाची तयारी ठेवा.”

सन्मानाचे क्षण – समाजभूषण व आदर्श माता पुरस्कार वितरण...

या मेळाव्याचा विशेष भाग ठरला सामाजिक योगदानाबद्दल देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार.जिल्ह्याच्या विविध भागांत कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

विशेष उल्लेखनीय ठरली १०५ वर्षांच्या श्रीमती शालनताई कुंडलिकराव पवार यांचा “आदर्श माता” पुरस्कार. त्या आजही मुलाच्या इस्त्री दुकानात जाऊन कपड्यांना इस्त्री करण्याचे कार्य करत आहेत. राजेंद्र पवार, नीलेश पवार व पवार कुटुंबीय* मोठ्या अभिमानाने उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीची निवड आणि गौरव...

मेळाव्यात *राज्यस्तरीय कार्यकारीणीची नव्याने निवड* करण्यात आली. खंडेराव कडलक यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे* देण्यात आली. उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश नाशिककर, उपाध्यक्ष नामदेव वाघमारे*, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, लॉण्ड्री विभागाचे प्रदेशाध्यक्ष गोविंदराव राऊत, माजी जिल्हाध्यक्ष शरद नाना पवार, भाऊसाहेब श्रीराम, नवनाथ शेवाळे, सुभाष राऊत, कल्पना गायकवाड, सुवर्णा सावर्डे, श्रीरंग मोरे, उमेश पवार, नारायण शेलार यांचा समावेश होता.

लॉण्ड्री व्यावसायिकांसाठी सवलतींची मागणी...

खंडेराव कडलक यांनी सरकारकडे मागणी केली की, लॉण्ड्री व्यावसायिकांसाठी वीजबिलात आणि व्यावसायिक वस्तू खरेदीवर ५०% सवलत देण्याचा निर्णय तातडीने अंमलात आणावा. "अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजातील बांधव हा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावेत," अशी विनंती त्यांनी केली.

प्रस्ताविक, स्वागत व आभाराचे कौतुक...

मेळाव्याचे निमंत्रक पुणे जिल्हाध्यक्ष विकास अभंग यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक स्वागत केले. जुन्नर तालुकाध्यक्ष सुभाष दळवी यांनी नेमके प्रास्ताविक केले. काळूराम अभंग यांनी सहज सुंदर सूत्रसंचालन केले, तर शिरूर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय शेलार यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment