जयदीप भाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगणी येथे पदाधिकाऱ्यांची निवड


प्रतिनिधी. नित्यानंद मोरे.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आमदार, मा. खासदार, लॉंग मार्च चे प्रणेते,आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेतृत्व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या निर्देशाने , राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्यमंत्री -उपाध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ जयदीप भाई कवाडे वाई पाचगणी दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगणी शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली. यावेळी वाई तालुका अध्यक्ष पदी बोपर्डी गावचे विजय सातपुते, वाई तालुका उपाध्यक्षपदी मांढरदेव चे संतोष शेळके 

, वाई तालुका संघटक पदी बापू सातपुते,युवक तालुका वाई कार्याध्यक्षपदी आकाश गायकवाड, युवक तालुका वाई उपाध्यक्ष पदी रोहित कवळे त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी नित्यानंद मोरे, राष्ट्रीय मजदूर सेनेच्या वाई तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रासकर यांची नियुक्ती सन्माननीय जयदीप भाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष युवराज गोस्वामी साहेब, सातारा जिल्हाध्यक्ष युवराज जी कांबळे, सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल जी कांबळे, सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, राष्ट्रीय मजदूर सेना सातारा जिल्हा संघटक विकास दादा जाधव आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment