दिक्षांत समारंभात चोपराम गडपायले यांना आचार्य पदवीने सन्मानित
प्रविण भोंदे प्रतिनिधी
भंडारा : पीएम श्री लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील सहाय्यक शिक्षक चोपराम गडपायले यांना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक जिल्हा नागपूर द्वारा आयोजित तेराव्या दीक्षांत समारंभामध्ये यूजीसीच्या नियमानुसार पीएचडी पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
चोपराम गडपायले यांना आचार्य पदवी प्रदान करताना संस्कृत भारतीचे संस्थापक पदमश्री कृष्णशास्त्री ,कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी, कुलसचिव डॉ. देवानंतर शुक्ल ,शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आदी अतीथीगनांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले .
चोपराम गडपायले यांनी सहयोगी प्राध्यापक, पदव्युत्तर शिक्षण विभाग, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. अमोल मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधाचा विषय" इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वापरामुळे उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम :एक शैक्षणिक अभ्यास" हा विषय होता.
*कठीण परिस्थितीवर मात करून उभरल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आदर्श*
चोपराम गडपायले हे अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन गावातील पहिले डॉक्टरेट पदवीप्राप्त झाले. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील पदवी व पदविका अशा एकूण 16 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे हेच त्यांचे उद्देश आहे. अनेकांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न असतो.त्यांनी महाराष्ट्र मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 200 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला समर्पित केलेलेआहे. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनेमध्ये सक्रिय असून ते महाराष्ट्र मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सचिव व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधानसचिव आहेत. ते पगारातील 10% रक्कम शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खर्च करतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रबोधन करणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांचे 'सायकॉलॉजी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट' ह्या पुस्तकाचे प्रकाशन झालेले असून ते उत्कृष्ट संशोधक, लेखक ,कवी विचारवंत व शिक्षणतज्ञ आहेत. ते शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये तज्ञमार्गदर्शक म्हणून कार्य करतात.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विवीध संघटनेचे पदाधिकारी व आप्तजनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत असल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment